प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शनिवारी रात्रीपर्यत नव्या कोरोना रूग्णांची संख्या 406 वर पोहोचली. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4 हजार 73 झाली आहे. दिवसभरात 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 113 झाली आहे. संसर्गित रूग्णसंख्या वाढत असणाऱया गावांची, भागांची संख्या वाढत आहे. प्रशासकीय आरोग्य यंत्रणेने कोरोना बळी नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने यंत्रणा उभारली जात आहे. दरम्यान रात्री उशिरा पर्यंत शहरामध्ये 200 हून अधिक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हय़ात शनिवारी सकाळपर्यत 388 रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 634 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 2 हजार 393 जण आयसोलेटेड केले आहेत. सकाळपर्यत 484 स्वॅब रिपोर्ट आले. त्यामध्ये 71 पॉझिटिव्ह आहेत तर 356 निगेटिव्ह आहेत. शहरात 15 पॉझिटिव्ह रूग्ण नव्याने दिसून आले आहेत. त्यामध्ये सायंकाळपर्यत 60 हून अधिक रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे.
जिल्हय़ात शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत 35 पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले. यापैकी शहरात 19 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत यामध्ये मोरे माने नगर 4 मंगळवार पेठ 1 कसबा बावडा 1 उद्यमनगर 2 सोमवार पेठ 1 पाचगाव 1, लाईन बाजार 2 रंकाला 2 कदमवाडी 1, शिवाजी पेठ 1 राजारामपुरी आठवी गल्ली 2 काटकर कॉलनी राजारामपुरी 2 शाहूपुरी पाचवी गल्ली एक यांचा समावेश आहे याशिवाय हातकणंगले गगनबावडा तालुक्यातील मांडुकली तीन हातकणंगले तालुक्यातील रांगोळी 3 परी 1 एक चंदगड 1 गांधिनगर 11 हातकणंगले यांचा समावेश आहे. जिह्यात शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत आणखी 23 रुग्णांची भर पडली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 11, करवीर तालुक्यातील 3, इचलकरंजीतील 7 आणि कोल्हापूर शहरातील जवाहरनगर परीरसारील एका रुग्णाचा समावेश आहे. जिह्यात दुपारी चार वाजेपर्यंत आणखी 74 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 24, इचरकरंजी 3, कोल्हापूर शहरातील 39 जणांचा समावेश आहे. लाईन बाजार 4, अश्विनी हॉस्पिटल 2, सन्मित्र सोसायटी राजारामपुरी 14 वि गल्ली 1, पाचगाव 2, हरिओम नगर 1, जवाहर नगर 1, उजळाईवाडी 2, एस पी ऑफीस पीडब्ल्यूडी विभाग 1, सीपीआर हॉस्पिटल 1 जवाहर नगर 1, यादव नगर 11, टेंबलाईवाडी 2veeieeUe पार्क 3, संभाजीनगर 1, सानेगुरुजी वसाहत 1, दौलत नगर 1, टिंबर मार्केट 1, विक्रम नगर 1, जवाहर नगर 1, वसगडे 1 राधानगरी कसबा वाळवे 1, शिये 5, भैरेवाडी पन्हाळा 1, शिरगाव 17 रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात 13 जणांचा मृत्यू
जिल्हय़ात शनिवारी कोरोनाने बळी गेलेल्यामध्ये चंदगड तालुक्यातील 64 वर्षीय वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील वाकरे येथील 65 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी लालनगर येथील 60 वर्षीय पुरूषाचा, कबनूर जयहिंद नगर येथील 46 वर्षीय पुरूष आणि जुना चंदूर रोड येथील 69 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील 65 वर्षीय वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात तर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथील 68 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळपर्यत आणखी दोघांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजी येथील 94 वर्षीय वृद्ध आणि पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील 83 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यामुळे दिवसभरातील कोरोना बळींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बळींची संख्या 112 झाली आहे.
उपजिल्हाधिकाऱयांच्या चालकास कोरोनाची लागण
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोनांचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी जिल्हा पुरवठा विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह सापडला होता. शनिवारी निवासी उपजिल्हाधिकाऱयांच्या चालकालाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी,त्यांचे दोन लिपीक, दोन शिपाई हे क्वारंटाईन झाले आहेत. गेल्या दहा दिवसात ही दुसरी घटना घडल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.
एकूण रुग्णसंख्या ः 4 हजार 73
बरे झालेले ः 1975
उपचार सुरु असणारे ः 2808
एकूण मृत ः 113