वार्ताहर / कुंभोज
दुर्गेवाडी तालुका हातकणंगले येथे उपकेंद्र हिंगणगाव अंतर्गत असणाऱ्या दुर्गेवाडी तेथे डेल्टा प्लस पेशंट सापडलेची माहिती आरोग्य विभाग यांच्या वतीने देण्यात आल्याने,कुंभोज, दुर्गेवाडी, हिंगणगाव परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. परिणामी डेल्टा प्लसचा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून. सदर आजाराची खबरदारी म्हणून तात्काळ उपाय योजनेसाठी महसूल विभाग,आरोग्य विभाग घटनास्थळी जाऊन युध्द पातळीवर काम करत आहे.
परिणामी सदर रुग्णांच्या परिसरातील तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना तपासणीला सुरुवात केली आहे. काल रात्री दुर्गेवाडी येथे डेल्टापल्सचा रुग्ण असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून ग्रामपंचायत महसूल विभाग व आरोग्य विभाग यांना देण्यात आली होती.त्या अनुषंगाने व आरोग्य यंत्रणेच्या सूचनेप्रमाणे हिंगणगाव व कुंभोज आरोग्य केंद्राच्या वतीने आज सदर रुग्णांच्या घरातील व परिसरातील जवळ जवळ शंभर लोकांचे स्वाँब तपासणीसाठी घेण्यात आले.
डेल्डा पल्सचा रुग्ण दुर्गेवाडी परिसरात आढळलाने कुंभोज, हिंगणगाव, दुर्गेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून.सदर आजाराबद्दल नागरिकातून मोठे तर्कवितर्क माडण्यात येत आहेत.
परिणामी आज सदर ठिकाणी हिंगणगाव आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित तोरस्कर ,कुंभोज आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य फडे ,गाव कामगार तलाठी. संभाजी घाडगे ,दुर्गेवाडी ग्रामसेवक मुल्ला सरपच घोलप, तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जवळ जवळ शंभर लोकांचे कोरोना टेस्ट करण्यात आली परिणामी डेल्टाचा रुग्ण दुर्गेवाडी येथे सापडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून काही नागरिकांनी आपल्या घराची दारे बंद करून घेतले आहेत.
दुर्गेवाडी नागरिकांनी संचारबंदी नियमांचे पालन करावे व कोणतीही भीती न बाळगता प्रशासनाला कोरोना टेस्ट, आरटीपीसीआर करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती हिंगणगाव आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सत्यजित तोरसकर यांनी केले आहे. परिणामी सदर रुग्णांचा रिपोर्ट बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था पसरली असून सदर रुग्णामध्ये कोणत्याही पद्धतीचे शारीरिक त्रास नसल्याने तसेच सदर रुग्ण दररोज आपल्या खाजगी कंपनीत कामावर जात असल्याने नागरिकांतून वेगवेगळ्या पद्धतीचे तर्कवितर्क मानले जात आहेत.