शाहुवाडी / प्रतिनिधी
येळाणे तालुका शाहुवाडी येथील सॉ मिलनजीक असलेली धोकादायक डी पी अन्यत्र सुरक्षित स्थळी हलववावी अशी मागणी येळाणे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मथुकर पाटील यांनी महावितरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि येळाणे येथे सॉ मिलनजीक असलेल्या डी पी नजीक इमारती, शेड व नागरी वस्ती आहे. सदर डी पी धोकादायक बनली आहे तरी त्वरीत सुरक्षित स्थळी हलवावी अशी मागणी सरपंच मधुकर पाटील , उपसरपंच सुरेश पटेल व सदस्य यांनी महावितरण कार्यालयाकडे केली आहे.