कोरोना मृत्यूंत घट, नव्या रूग्णांत वाढ, 7 मृत्यू, 493 नवे रूग्ण, 776 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 493 नवे रूग्ण आढळले तर 776 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 5 हजार 295 झाली आहे. नव्या रूग्णांत वाढ झाली असली तरी कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्ये घट झाली आहे. शहरात प्रथमच नवी रूग्णसंख्या शंभराच्या आत आली आहे.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 557 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 969, नगरपालिका क्षेत्रात 796, शहरात 1 हजार 207 तर अन्य 585 आहेत. दिवसभरात 776 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 87 हजार 331 झाली आहे.
गेल्या 24 तासांत आढळलेल्या 493 नव्या रुग्णांमध्ये आजरा 12, भुदरगड 2, चंदगड 2, गडहिंग्लज 7, गगनबावडा 0, हातकणंगले 61, कागल 33, करवीर 97, पन्हाळा 33, राधानगरी 7, शाहूवाडी 30, शिरोळ 51, नगरपालिका क्षेत्रात 58, कोल्हापुरात 93 तर अन्य 6 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 98 हजार 183 झाली आहे.
कोल्हापूर शहरातील मृत्यू
परजिल्ह्यातील बेळगाव येथील एकाचा तर कोल्हापूर शहरातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरात 93 नवे रूग्ण दिसून आले. कोरोनाने मृत्यू झालेल्यामध्ये राजेंद्रनगर आणि मोरे मानेनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण : 493 एकूण : 1,98,183
कोरोनामुक्त ः 776 एकूण : 1,87,331
कोरोना मृत्यू ः 7 एकूण मृत्यू : 5557
सक्रीय रूग्ण ः 5295