प्रतिनिधी/शिरोळ
शहरातील कोळी गल्ली येथे राहणार्या महसूल विभागात कामास असलेल्या एका कर्मचार्याच्या कुटुंबातील पाच व घरकाम करणाऱ्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या तेरा पैकी 5 जणांचा रिपोर्टट निगेटिव्ह आला आहे. तर अन्य दोघांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथील कोळी गल्ली मध्यें राहणारे महसूल विभागात काम करीत असलेले 56 वर्षाच्या इसमाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ माजली होती. यानंतर कोळी गल्लीतील काही भाग सील करण्यात आला आहे. या इसमाच्या घरातील सात जणांबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा असे एकुण तेरा जणांना ताब्यात घेऊन त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आला असल्याची माहिती मुख्याधिकारी तैमूर मुलांनी यांनी दिली.
आज अखेर शिरोळमध्ये 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात घरकाम करणाऱ्या महिलेचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आल्याने कोरवी गल्ली परिसरही हादरून गेला आहे. ही महिला कोणकोणत्या ठिकाणी घरकाम करत होती याची माहिती आता प्रशासन घेण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ शहरात एकाच कुटुंबातील सदस्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.