बरे झाल्याने तब्बल 39 जणांना सोडले घरी
दिवसभरात सहा जणांचा मृत्यू. एकूण रुग्णसंख्या झाली 3439
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोना आजाराचे रुग्ण वाढतच चालले असून आज मंगळवारी सोलापूर शहरात 38 जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर ग्रामीणमध्ये ३० जण सापडले. दिवसभरात शहरात पाच जणांचा तर ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत शहर आणि जिह्यातील मृतांची संख्या ३०९ एवढी झाली आहे. रुग्णसंख्या शहराची २८५२ तर ग्रामीणची ५८७ एवढी असून एकूण ३४३९ एवढी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे.
सोलापूर शहरात मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत ३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल ३९ जणांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी मंगळवारी दिली. सोलापूर शहरात मंगळवारी २७१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर २३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ३८ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये २२ पुरुष तर १७ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८५२ झाली आहे. तसेच उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने ३९ जणांना घरी सोडण्यात आले.
ग्रामीण भागात ३० कोरोनाबाधित रुग्णांची भर
सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी ३० कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये १७ पुरुष, १३ स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा मृत्यू तर आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्यातील ग्रामीण भागात एकूण ५८७ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) दोन, तालुका कारंबा (ता. उत्तर सोलापूर) एक, मंगळवार पेठ बार्शी एक, बार्शी एक, साकत पिंपरी (ता. बार्शी) दोन, वैराग (ता. बार्शी) एक, खवणी (ता. मोहोळ) एक, फतेसिंह चौक अक्कलकोट ७, जंगी प्लॉट, अक्कलकोट पाच, बुधवार पेठ अक्कलकोट एक, चपळगाव (ता. अक्कलकोट) एक, तालुका अक्कलकोट एक, बोरगाव (ता. अक्कलकोट) एक, गोविंदपुरा पंढरपूर एक, जुनी कोळी गल्ली पंढरपूर एक, गुरसाळे (ता. पंढरपूर) ७, भोसरे (ता. माढा) एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज २७० जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २४० अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३० पॉझिटिव्ह आढळले आहे. ५८७ रुग्णांपैकी ३७५ पुरुष २१२ स्त्री आहेत. तालुक्मयात तर आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २४१ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट ११६, मंगळवेढा १,
बार्शी ११०, माढा १२,
माळशिरस ६, मोहोळ २९,
उत्तर सोलापूर ६१, करमाळा ६,
सांगोला ४, पंढरपूर ३२,
दक्षिण सोलापूर २१०
एकूण ५८७
होम क्वारंटाईन १७७८
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती ५०७४
प्राप्त अहवाल ५०१०
प्रलंबित अहवाल ६४
एकूण निगेटिव्ह ४४२४
कोरोनाची एकूण संख्या ५८७
उपचारात ३१९
बरे २४१
मृत २७