प्रतिनिधी / शिरोळ
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी श्री. बी.बी.शिंदे यांचे मंगळवार अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्युसमयी ते 67 वर्षांचे होते. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी २० वर्षे सेवा बजावली. स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचे विश्वासू अधिकारी होते. कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
बी.बी.शिंदे यांचे मूळ गांव पन्हाळा तालुक्यातील पोखले होते. त्यांचा जन्म १९५३ साली झाला.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करुन ते यापूर्वी वारणा उद्योग समुहामध्ये के. तात्यासाहेब कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. स्वभावाने शांत, मनमिळावू आणि अत्यंत शिस्तप्रिय होते.
कारखाना कार्यस्थळी चेअरमन गणपतराव पाटील यांचेसहित सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी अंत्यदर्शन घेवून अध्दांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन 16 रोजी सकाळी आठ वाजता पोखले येथे आहे.