मुख्यमंत्र्यशी चर्चा करून कोल्हापूर युनिटची सर्व दुकाने सुरू करणार : पालकमंत्र्यांचे आश्वासन
आयुक्त व आमदार जाधव यांची आज भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील टेस्टींग रेट 8.48 टक्के आला आहे. त्यामुळे सर्व दुकाने या आठवडÎात सम-विषम पध्दतीने चालू करणार तर पुढील आठवडÎापासून सर्व दुकाने चालू करणार.असल्याचा इशारा कोल्हापूर चेंबरने दिला आहे. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सर्व दुकाने लवकर उघडण्यास परवानगीदेऊ. असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी, कोल्हापूर चेंबरऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सलग्न व्यापारी संघटनेच्या बैठकीमध्ये दिले. कोल्हापूर इंजिनियरींग असोशिएशनच्या कै. माधवराव बुधले सभागृहात ही बैठक सोमवारी झाली.
सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा चेंबरने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार संजय मंडलिक, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रमुख्य उपस्थिती होती.
`कोरोनाच्या काळात गेली 80 दिवस व्यापाऱयांची दुकाने बंद असल्याने, व्यापाऱयांना फार मोठे आर्थिक संकट सहन करावे लागत आहे..याबाबत पालकमंत्री, सतेज पाटील म्हणाले, व्यापाऱयाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडे मांडून कोल्हापूर जिल्हातील शहर युनिट वेगळे करून लवकरात लवकर सरसकट सर्व व्यापारी दुकाने उघडणेसंबधी प्रयत्न करणार आहे. महानगर पालिकेसंदर्भात ज्या समस्या आहेत. त्यासंबधी आपण प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा केली असून त्यासंदर्भात दिलासादायक निर्णय देणार असल्याचे सांगून, आज मंगळवारी चेंबरच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समवेत प्रशासकांना भेटावे. असे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले.
या बैठकीमध्ये आनंद माने, प्रदीपभाई कापडीया, कुलदीप गायकवाड, उज्वल नागेशकर, गुरूदत्त देसाई, मुरली रोहीडा, अध्यक्ष अनिल धडाम, राजूभाई परीख यांनी मनोगत व्यक्त केले.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्र्याकडे केल्या व्यापाऱयांच्या मागण्या
-.सर्व व्यापाऱ़यांचा आर्थिक वर्ष 2021-22 चा घरफाळा माफ करावा. -शहरातील पाणीपट्टी मध्ये करण्यात आलेली दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी. -परवाना नुतनीकरणाची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवून मिळावी.
-नुतनीकरण मुदत संपलेनंतर करण्यात येणारी 15 टक्के व 20 टक्के दंड आकारणी करणेत येवू नये.
– व्यापारी व उद्योजकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने फायरसेस मध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ केलेली आहे. ही वाढ तात्काळ मागे घ्यावी.
खासदार संजय मंडलिक म्हणाले-
जिल्हातील लोक प्रतिनिधी व प्रशासन यांनी खूप चांगले नियंत्रण ठेवूनही कोविड 19 या रोगाच्या रूग्णांची संख्या कमी न झाल्याने, इच्छा असूनही व्यापार बंद ठेवावा लागत आहे. महापालिकेसंदर्भात व्यापाऱ़यांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी मांडण्याचे कर्तव्य आम्हां लोकप्रतिनिधीचे आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे या समस्या मांडाव्यात.’
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले-
`इच्छा असूनही शासनाला दुकाने उघडणेस परवानगी देता येत नाही’ पालकमंत्री सतेज पाटील यांनी यातून सर्व व्यापारी वर्गाला बाहेर काढण्यासाठी साथ द्यावी. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सरसकट दुकाने उघडणेस परवानगी द्यावी’