जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकरण मोहिमेस सुरवात
प्रतिनिधी / जत
कोविड लस सुरक्षित असून ती सर्वांनी घ्यावी असे आवाहन आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले. आज शुक्रवारी सकाळी जत ग्रामीण रुग्णालयात डॉ. रविकुमार जीवानावार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर यांना पहिली लस टोचून लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत अवटी, तहसीलदार सचिन पाटील, माजी पं. स. सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जत पं.स.सदस्य रविंद्र आप्पा सावंत, जत पं. स.सदस्य दिग्विजय चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर, डॉ. मोहिते, डॉ. नाईकवाडी, डॉ. खोत, डॉ. पवार, डॉ. तुळजाणवर,डॉ. जिवनावर,डॉ. खिलारे, सानप, राऊत व सर्व स्टॉप उपस्थित होते.