ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ ही लस लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना वाचवण्यात 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचवण्यात ही लस 93.4 टक्के तर लक्षणं नसलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी 63.6 टक्के प्रभावी ठरल्याचे लँसेटच्या अभ्यासातून समोर आले आहे.
‘लँसेटच्या अभ्यासात म्हटले आहे की, शरीरात निष्क्रिय विषाणू पाठवून प्रतिकारशक्ती सक्रिय करण्याच्या तंत्रावर काम करणारी कोवॅक्सिन लस दोन डोसनंतर मानवी शरीरात कोरोनाविरोधात जबरदस्त प्रतिपिंड तयार करते. त्यामुळे कोरोना रुग्णांना वाचविण्यात ही लस 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. भारतात नोव्हेंबर 2020 ते मे 2021 या कालावधीत 18 ते 19 वयोगटातील 24,419 लोकांवर झालेल्या चाचण्यांमध्ये लसीचे कोणतेही गंभीर परिणाम दिसून आले नाहीत. ही लस SARS-CoV-2 व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटविरोधात 70.8 टक्के संरक्षण प्रदान करते.