केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघाने आनंद कोचिंग अकादमी संघाचा 48 धावानी पराभव करून 4 गुण मिळविले. राहुल वेर्णेकरने केलेल्या 73 धावा, आदित्य स्वयंबागी व सचिन रजपूत यांनी केलेल्या प्रत्येकी 65 धावा व आनंद अकादमीच्या रोहित पाटीलने 4 बळी व 62 धावा करून केलेले अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन हे या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले.
ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियमवर केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्रिकेट क्लब कर्नाटका संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात सर्व बाद 283 धावा केल्या. त्यात राहुल वेर्णेकरने चार चौकारासह 73, सचिन रजपूतने 2 षटकार, 9 चौकारासह 65, आदित्य स्वयंबागीने 9 चौकारासह 65, लिखीत बन्नूरने 18, श्रीहरी माद्याळकरने 13 तर राजेंद्र दिगण्णावरने 12 धावा केल्या.
आनंद अकादमीतर्फे रोहित पाटीलने 58 धावात 4, आर्यन उपाध्येने 38 धावात 2 तर हर्ष पॅट्रॉट, आनंद कुंभार, किसन मेघराज, विनोद देवाडिगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीचा डाव 48.5 षटकात सर्व बाद 235 धावात आटोपला. त्यात रोहित पाटीलने 1 षटकार, 6 चौकारासह 64, आनंद कुंभारने 1 षटकार 4 चौकारासह 62, प्रसाद सुगुरने 29, विनोद देवाडिगाने 23 तर नितीन एस.ने 15 धावा
केल्या.
क्रिकेट क्लब कर्नाटकातर्फे लिखित बन्नूरने 40 धावात 3, वि. विक्रमने 46 धावात 3, अनिलगौडा पाटीलने 39 धावात 2, श्रीहरी माद्याळकरने 1 गडी बाद केला.