बॉलिवूड अभिनेत्री क्रीति सेननला दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. राब्ता चित्रपटापासून स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱया क्रीतिचे लाखो चाहते आहेत. चित्रपटांसोबत सोशल मीडियावरील स्वतःच्या पोस्टवरूनही ती चर्चेत असते.
क्रीति सेननच्या ‘बहुप्रतीक्षित ‘मिमि’ चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा सरोगेट मातेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. कोरोना संकटामुळे हा चित्रपट आता ओटीटीवर पहायला मिळणार आहे.
क्रीति काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशात अभिनेता वरुण धवन सोबत ‘भेडिया’ चित्रपटाचे चित्रिकरण करत होती. तसेच राजकुमार राव याच्यासोबत ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटात ती काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने बच्चन पांडे चित्रपटाचे चित्रिकरण संपविले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर क्रीति लवकरच सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसून येईल.