वृत्तसंस्था/ प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या प्राग खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या पेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेत्या बार्बोरा क्रेजिकोव्हाने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. आता क्रेजिकोव्हा आणि मार्टिनकोव्हा या झेकच्या दोन टेनिसपटूंमध्ये अंतिम लढत होईल.
शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात क्रेजिकोव्हाने चीनच्या वेंगचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य सामन्यात झेकच्या मार्टिनकोव्हाने बेल्जियमच्या नवव्या मानांकित मिनेनचा 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. 2021 च्या टेनिस हंगामात क्रेजिकोव्हाने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा तसेच स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. 23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत क्रेजिकोव्हाचे लक्ष प्रामुख्याने सुवर्णपदकावर आहे.