वृत्तसंस्था / लंडन
एटीपी टूरवरील जून महिन्यात होणाऱया पुरूषांच्या क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड अँडी मरे तसेच डॅन इव्हान्स याचा सहभाग राहणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी सोमवारी दिली आहे.
33 वर्षीय अँडी मरेने आतापर्यंत एटीपी 500 क्विन्स क्लब टेनिस स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे,. गेल्या मार्चमध्ये रोटरडॅम स्पर्धेत मरेने आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता आणि त्या स्पर्धेत रशियाच्या रूबलेव्हने मरेचा पराभव केला होता. या स्पर्धेनंतर अँडी मरेला मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून स्नायू दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. विंबल्डन स्पर्धेपूर्वी दोन आठवडे अगोदर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला 14 जून पासून प्रारंभ होणार असून कोरोना समस्येमुळे केवळ 25 टक्के शौकिनांना प्रवेशांची मुभा राहील.