सातारा / प्रतिनिधी :
वाई येथून धावडीच्या दिशेने जात असताना बोपर्डी गावच्या हद्दीत खड्डयात बुलेट आदळून झालेल्या अपघातात धावडी ता. वाईचे सरपंच अमोल रामचंद्र कांबळे (वय 30, रा.धावडी) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल कांबळे हे त्यांची बुलेट (क्र. एम. एच. 11 सी. पी. 2604) वरून वाई येथून धावडीला निघाले होते. त्यांची बुलेट बोपर्डी गावच्या हद्दीत बसच्या चौकीसमोर पडलेल्या खडय़ात आदळून अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी वाई येथील गीतांजली हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार हे करत आहेत.