वार्ताहर /लाटंबार्से
खरपाल – लतंबर्सेम् येथील युवकांनी अपक्ष उमेदवार डॉक्टर चंद्रकांत शेटय़? यांच्या वचननामा आणि चींन्हाचे घरोघरी वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या चिन्ह आणि वाचन नाम्याला लोकांकडून वाढता प्रतिसाद लाभला. वचननाम्यात त्यांनी पाच वर्षात जी कामे पूर्ण होईल तेच वाचनाम्यात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. खरपाल या भागात बेरोजगारीची समस्या मोठी असून ही समस्या दूर करण्यासाठी लतंबरस औद्योगिक वसाहतीला चालना देवून प्रत्येक घरामध्ये घरटी एक नोकरी देण्याचा डॉ. चंद्रकांत शेटय़? यांचा संकल्प आहे. या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवातही केलेली आहे. महिला वर्गाला सबलीकरण करण्यासाठी लघु उद्योग सुरू केले जाईल त्यातून त्या घरसंभाळून या यवासायकडे लक्ष केंद्रित करू शकेल येवढेच नसून त्यांच्या व्यवसायाला बाजारभाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. मतदारसंघाच्या प्रत्येक वाडय़ावर कार्यकर्ते सज्य असून गाठीभेटी घेवून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम जोरात चालू आहे. आतापर्यंत डिचोली नगर पालिका बरोबर पंचायत शेत्रातील मतदारसंघ पिंजून काढला असून यापुढे कोपरा बैठकीवर भर दिला जाईल. सर्वत्र लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.