एलन मस्क यांची घोषणा
तंत्रज्ञानाच्या जगतात टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क वेगाने पुढे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची कपनी ह्मुमनॉइड रोबोट तयार करत असून पुढील वर्षापर्यंत याचा प्रोटोटाइप तयार होणार आहे. कंटाळवाणे आणि धोकादायक कामांपासून सुरुवात होणार असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर या रोबोटला फिक्शनल कॉमिक आणि चित्रपटातील व्यक्तिरेखा आर्यन मॅन म्हटले जाऊ लागले आहे.
या रोबोटमध्ये मानवी चेहऱयाच्या जागी स्क्रीन लावलेली असेल, जी महत्त्वाची माहिती डिस्प्ले करणार आहे. या रोबोटचा अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडणार आहे. शारीरिक काम भविष्यात एक पर्याय ठरेल आणि एक जागतिक सरासरी उत्पन्न आवश्यक असेल असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
कुठली कामे करणार?
माणसांप्रमाणे दिसणारे रोबोट अत्यंत आकर्षत राहिले आहेत. पण त्याच्याकडून माणसांप्रमाणे पूर्ण कामे करवून घेणे अत्यंत अवघड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स वेगाने वाढले असले तरीही लोकांच्या हिस्स्याची कामे स्वतः करू शकेल इतपत विकसित झालेले नाही. सद्यकाळात रोबोटकडून सफाई किंवा सामानाची ने-आण करण्यासारखी कामे करवून घेतली जातात. हा रोबोट 5 फूट 8 इंचाचा असेल आणि याचे वजन सुमारे 56 किलोपर्यंत असणार आहे. तो 20 किलोपर्यंत वजन उचलू शकेल आणि 5 मैल प्रतितासाच्या वेगाने चालू शकणार आहे.