कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर चर्चा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
खासदार संजय मंडलिक यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई मध्ये भेट घेतली. या भेटीत कोल्हापूर खंडपीठ, युनिफाईड बायलॉज, अपुरे सिंचन प्रकल्प आदीसह इतर प्रश्नांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत धोरणाचा राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची विशेष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली.
कोल्हापुरात खंडपीठ व्हावे ही जुनी मागणी आहे त्यासाठी जलदगतीने कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कोल्हापूर क्रीडाईने युनिफाईड बायलॉज लागू करण्याची मागणी केली आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. जिह्यातील अपुरे असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी. कोल्हापूर जिह्यात कृषी विद्यापीठाची उभारणी व्हावी, या मागण्या हजार मंडलिक यांनी केल्या. गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरातील नुकसानग्रस्ताना तातडीने आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी खासदार मंडलिक यांनी केली.
खासदारांना ही निधी द्या
कुणाच्या संकटामुळे केंद्र सरकारने खासदारांचे निधी थांबवले आहे त्यामुळे राज्य सरकार कडून खासदारांना आमदारांनी प्रमाणेच विविध विकास कामांसाठी निधी देण्यात यावा तसेच केंद्र सरकारकडूनही निधी मिळावा यासाठी सर्व खासदारांच्या वतीने केंद्राकडे मागणी करावी असेही खासदार मंडलिक यांनी यावेळी सांगितले.
सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाची सुविधा द्या
सीमा भागातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी चंदगड येथे महाविद्यालयाची उभारणी केली असली तरी त्या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स बरोबरच व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.