प्रतिनिधी/ खेड
शहरातील वाल्की गल्लीतील सुक्या मासळीचे व्यावसायिक रिझवान अजीज मणियार यांनी प्लास्टीक पिशव्यांचा वापर केल्याप्रकरणी येथील नगर परिषदेने 5 हजार रूपयांचा दंड आकारला होता. मात्र 5 दिवसांचा कालावधी लोटूनही दंडाची रक्कम न भरल्याने अखेर नगर परिषदेने दुकान सील करण्याची कारवाई केली.
स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर व वरिष्ठ अधिकारी जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. पथकात परशुराम पाथरे व कर्मचाऱयांचा समावेश होता. प्लास्टीक पिशव्यांवर बंदी असतानाही काही दुकानदार छुप्या पध्दतीने पिशव्यांचा वापर करत आहेत. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर नगर परिषदेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या धडक मोहिमेमुळे दुकान व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.