चिपळूण
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात असतानाच पोलिसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पोलिसांच्या संकल्पनेतून येथील पोलीस स्थानकात ‘सॅनिटायझर डोम’ उभारण्यात आला आहे. यातूनच पोलीस स्थानकात येणाऱया प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण होत आहे.
संचारबंदीच्या काळात पोलीस प्रशासन महत्वाची भूमिका बजावत असून आहे. केवळ बंदोबस्त न करता नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचे आरोग्यही चांगले राहणे गरजेचे आहे. यादृष्टीने येथील पोलीस स्थानकात प्रवेशद्वारावरच हा सॅनिटायझर डोम उभारण्यात आला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱयावर निर्जंतुकीकरण द्रावणाचा फवारा उडून या डोममधून येणारी प्रत्येक व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होत आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणादेखील प्रवेशद्वारावर बसवण्यात आली आहे. उपविभागिय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला हा सॅनिटायझर डोम पोलिसांना उपयुक्त ठरत आहे.