नंदगड : खैरवाड (ता. खानापूर) येथील दुर्गा देवीचा यात्रोत्सव मंगळवार दि. 19 पासून दोन दिवस होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीला पूजा, गाऱहाणे व दुपारी महाप्रसाद होणार आहे. तर बुधवार दि. 20 रोजी हुडगम्मा देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. खैरवाड गावच्या उत्तरेला तीन किलोमीटर डोंगरमाथ्यावर दुर्गादेवी देवीचे मंदिर आहे. वर्षातून एकदा येथे यात्रोत्सव होतो. दुर्गादेवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. तर हुडगाम्मा देवीचे मंदिर खैरवाड गावात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे जानेवारीच्या दरम्यान दोन दिवस दोन्ही देवींचा यात्रा उत्सव साजरा होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावषी यात्रा उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
Previous Articleनंदगड एपीएमसी अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या हालचाली
Next Article हिंडलगा जि. पं. फंडातून रस्ताकामाचा शुभारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.