प्रतिनिधी/सातारा
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणच्या दिशेने जाणाऱया खैर लाकडाची तस्करी करणाऱया ट्रकला घेऊन ट्रकसह 15 लाख रुपयांचे खैरे लाकुड हस्तगत करण्यात सातारा वन विभागाच्या भरारी पथकाला यश आले.
याबाबत विभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, गुजरात येथून खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची तस्करी करणारा एक ट्रक चिपळूणच्या दिशेला जाणार असल्याची गोपनीय माहिती वन विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दि. 1 ऑक्टोंबर रोजी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निसराळे फाटा येथे सापळा लावला असता मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा ट्रक क्रमांक एम. एच. 04 वाय 4434 हा ट्रक तेथून जात असताना ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठय़ा प्रमाणावर खैर लाकुड असल्याचे निष्पन्न झाले. वन विभागाच्या पथकाने ट्रकसह सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्या असून या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा शोध वन विभागाने सुरू केला आहे.
या कारवाईत वनक्षेत्र परिअधिकारी सचिन डोंबाळे, सातारा तालुक्याचे वनक्षेत्र परिअधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल दीपक गायकवाड, विजय भोसले वनरक्षक आनंद जगताप, राजेश वीरकर, सुहास पवार, राज मुसलगे यांनी सहभाग घेतला.