वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील खोतोडा याठिकाणी दुचाकी व घराचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी बाळू उर्फ भावेश घोलकर याला अटक केली आहे. यात सुमारे लाखाचे नुकसान झाले असून हा प्रकार आज संध्याकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की खोतोडा येथे दुर्गेश नाईक यांच्या घरासमोर असलेली दुचाकी स्कूटर यावर पहिल्यांदा बाळू घोलकर यांनी हल्ला करून तिची मोठय़ा प्रमाणात नुकसान केली.त्यानंतर घरासमोर असलेल्या तुळशी वृंदावनाचीत्यांनी नुकसानी केल्यानंतर त्यांनी घराच्या दर्शनी भागाची मोठय़ा प्रमाणात नुकसान केली.
यासंदर्भात तक्रार दत्तू नाईक यांनी वाळपईच्या पोलिसांना खबर दिली असता पोलिसांनी यासंदर्भात सविस्तरपणे चौकशी करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान यासंदर्भात दुर्गेश नाईक यांनी अधिक माहिती देताना सांगितले की सदर प्रकार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अचानकपणे बाळू घोलकर हा हातामध्ये कुऱहाड घेऊन आपल्या घरासमोर आला व घरासमोर पार्क करून ठेवलेली स्कूटर त्याच्यावर त्यांनी ?र्हाडीने हल्ला करून मोठय़ा प्रमाणात नुकसान केली. यावेळी त्यांनी अडविण्याचा प्रयत्न घरातील मंडळीकडून केला .मात्र तो अयशस्वी ठरला .त्यानंतर त्यांनी घरासमोर असलेल्या तुळशी वृंदावनाचेमोठय़ा प्रमाणात नुकसान केले. यावरच न थांबता त्याने घरातील समोरील दर्शनी भागाची मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याचे दुर्गेश नाईक यांनी स्पष्ट केले. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा त्यांनी इन्कार केला.
यापूर्वी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. मात्र अचानकपणे केलेल्या प्रकारामुळे आपल्याला एक लाखांच्या आसपास नुकसानी झालेली आहे. पोलीस स्थानकावर यासंदर्भाची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला अटक केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी दुर्गेश नाईक यांनी केली आहे.
बाळू घोलकर हा दारू पिऊन आला होता. अशाच प्रकारची दहशत वारंवारपणे करीत असून आतापर्यंत सदर गावातील अनेकांची त्यांनी नुकसानी केलेली आहे. यामुळे पोलिसांनी त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी दुर्गेश नाईक याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना दुर्गेश नाईक यांनी सांगितले की संशयिताचे घर आपल्या शेजारी बसून आपल्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका असल्याचे दुर्गेश नाईक स्पष्ट केले आहे. यामुळे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन त्याला ताबडतोब बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत पोहोचविणार असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.