वृत्तसंस्था/ गुवाहाटी
खेलो इंडिया युथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात खो-खोमध्ये सलग तिसऱयांदा सुवर्णपदकांचा चौकार नोंदवित महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने 17 वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्येही अजिंक्मयपदावर मोहोर नोंदविली.
मुख्य स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेतील 17 वर्षाखालील मुलांमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा 19-11 असा सहज पराभव केला. पूर्वार्धात त्यांच्याकडे 10-5 अशी आघाडी होती. त्यांच्या विजयात रामजी कश्यप (साडेचार मिनिटे व एक गडी), ह्रषिकेश शिंदे (2 मिनिटे 20 सेकंद व 4 गडी), सिद्धेश थोरात (2 मिनिटे व 5 गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.
महाराष्ट्राने मुलींच्या 17 वषार्खालील गटाच्या अंतिम सामन्यात दिल्ली संघाला 14-8 असे निष्प्रभ केले. मध्यंतराला त्यांच्याकडे 9-4 अशी आघाडी होती. महाराष्ट्राकडून प्रांजल मडकर (2 मिनिटे 40 सेकंद, 1 मिनिट 20 सेकंद व एक गडी), प्रीति काळे (1 मिनिट 10 सेकंद, 4 मिनिटे व 1 गडी), किरण शिंदे (दीड मिनिटे, दोन मिनिटे व 2 गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
महाराष्ट्राने या स्पर्धेतील 21 वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटांतही सुवर्णपदक मिळविले होते. नवी दिल्ली येथे 2018 मध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत व त्यानंतर पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्राला चारही गटांमध्ये विजेतेपद मिळाले होते
बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्र अंतिम फेरीत
महाराष्ट्राने उत्कंठापूर्ण लढतीत पंजाबवर 77-76 असा निसटता विजय नोंदविला आणि मुलींच्या 21 वषार्खालील गटात अंतिम फेरी गाठली. पूर्वार्धात महाराष्ट्राकडे 38-35 अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरल. महाराष्ट्र संघाच्या विजयात कर्णधार श्रेया दांडेकर (26), दुर्गा धर्माधिकारी (19) व ऋतुजा पवार (16) यांनी मोठा वाटा उचलला.