ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समधून भारतात आणण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवली येथील खंडणीच्या प्रकरणांमध्ये तो पोलिसांना हवा होता.
पुजारीवर खंडणीचे 23 गुन्हे दाखल होते. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी 2017 आणि 2018 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. मात्र, तो मागील 15 वर्षांहून अधिक काळ फरार होता. ऑक्टोबर 2021 मध्ये फिलिपाईन्समध्ये पकडला गेला होता. 14 डिसेंबरच्या रात्री उशिरा त्याला अटक करुन भारतात आणण्यात आले. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱयांनी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले होते. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सुरेश पुजारी याने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि रवी पुजारीसोबत काम केले आहे. त्यानंतर त्याने स्वत:ची टोळी सुरू करुन मुंबई परिसरात खंडणी वसूल करण्यास सुरूवात केली.