प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज शहरातील काळभैरी मार्गावर अनधिकृत देशी दारूचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. शुक्रवारी दि २३ रोजी रात्री छापा टाकून 6 लाख 39 हजाराचे अवैद्य देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी अंकुश सुरेश भोसले (रा. औरनाळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गडहिंग्लज शहरात उत्पादन शुल्कने केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
गडहिंग्लज शहरातील काळभैरी मार्गावर अनधिकृत देशी दारूचा साठाचा असल्याची माहिती मिळाली होती. उपायुक्त वाय. एम. पोवार, अधिक्षक संध्याराणी देशखूम, उपअधिक्षक बी. आर. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात बेकायदेशीर दारूचा साठा असल्याच्या वृत्तांनतर ही कारवाई केली. यामध्ये देशी दारूचे विविध प्रकारचे 345 बॉक्स इतका मोठा दारू साठा जप्त केला आहे. 6 लाख 39 हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादकचे निरीक्षक एम. एस. गरूड, दुय्यम निरीक्षक जी. एन. गुरव, ए. बी. वाघमारे, एस. आर. ठोंबरे आदीने कारवाई केली आहे. या कारवाईच्या वेळी काळभैरी मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.