कोरोनाचा हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कसोटीचा आहे. काहींच्या नोकर्यांवर गदा आली आहे. पगारात कपात केली जात आहे. उद्योग-व्यवसाय रूळावर यायला काही काळ जावा लागणार आहे. म्हणूनच या दिवसात आपल्याकडे असणार्या पैशांचं योग्य नियोजन करायला हवं. या काळात पैशांचा वापर कसा करावा याविषयी…
* कर्जाचे हप्ते वेळेत भरा. हप्ते भरण्यासाठी बँकेकडून वेळही मागून घेता येईल. मात्र हप्ते उगाचच अडकवून ठेऊ नका. यामुळे क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल.
* सध्याच्या काळात सतत बँकेत जाणं किंवा एटीएममधून पैसे काढणं शक्य नाही. तसंच वारंवार बाहेर जाणं योग्यही नाही. म्हणूनच ऑनलाईन पेमेंटच्या पर्यायांची निवड करा. शक्य तितक्या कॅशलेस राहा. डिजिटल बँकिंगमुळे
तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचेल.
* आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रत्येक कागदपत्रं जपून ठेवा. सध्या डिजिलॉकरची सोय आहे. या लॉकरमध्ये तुमची कागदपत्रं अगदी सुरक्षित राहतील. या पर्यायाचा वापर करा. * योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. आरोग्य विमा तसंच जीवन विमा काढून घ्या.