म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात आजी -आजोबा दिन नुकताच संपन्न झाला.
जागतिक ज्येष्ट नागरिक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात दरवषी आयोजित करण्यात येणाऱया आजी-आजोबा दिनी एका आजी-आजोबा दांपत्याचा सन्मान करण्यात येतो व विद्यार्थी व आचार्य या दांपत्याचे आशीर्वाद घेतात.
या वषी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री.सुधीर राजाराम सिनाई भौंसुले व सौ.सरस्वती सुधीर सिनाई भौंसुले या युको बॅ?केतून निवृत्त झालेल्या आजी-आजोबा दांपत्याचा सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य गजानन मांदेकर यानी श्री.सुधीर सिनाई भौंसुले यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला,तर ज्येष्ट आचार्य शिल्पा पै पाणंदीकर यानी सौ.सरस्वती सिनाई भौंसुले यांची ओटी भरून सन्मानित केले.
श्री.सुधीर सिनाई भौंसुले यानी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.प्राचार्य गजानन मांदेकर यानी समारोपाच्या भाषणात आजी-आजोबा दिनाचे महत्त्व विशद करताना आपण केवळ घरातीलच नव्हे,तर समाजातील सर्व ज्येष्ठाचा मान राखला पाहिजे हा संदेश देण्यासाठी दरवषी विद्यालयात आजी-आजोबा दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख आचार्य श्रेया नाईक यानी केले.आचार्य डॉ.अक्षया भगत यानी परिचय केला. आचार्य नेहा मडकईकर यानी ऋणनिर्देश केला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व आचार्यांनी सिनाई भौंसुले दांपत्याचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.