प्रतिनिधी /मोरजी
मोरजी येथील सत्पुरुष कल्चरल क्लब आयोजित व स्व जनार्दन शेटगावकर स्मृती व नागशेट बंधू पुरस्कृत मरडीवाडा मर्यादित श्री गणेश चलत चित्र देखावा स्पर्धेत कु मंदार हरिश शेटगावकर यास प्रथम बक्षीस प्राप्त झाले.
स्पर्धेत द्वितीय कु कौस्तुभ गजानन शेटगावकर यास तर आरास स्पर्धेत प्रथम शेटय़? परिवारास ,द्वितीय सुरेश रामशेट परिवार व तृतीय कु मेघा शेटगावकर व डॉ विशाखा प्रथमेश सावंत याना विभागून देण्यात आले.स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री दाडोबा देवस्थानच्या सभामंडपात संपन्न झाले.ह्या सोहळय़ास देवस्थानचे अध्यक्ष तथा मोरजीचे उपसरपंच अमित शेटगावकर सत्पुरुष कल्चरल संघाचे अध्यक्ष विजयेश शेटगावकर,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सोनू शेटगावकर,क्लबचे उपाध्यक्ष अनिल गाड,माजी उपाध्यक्ष राजन शेटगावकर उपस्थित होते.सत्पुरुष सांस्कृतिक संघाने चतुर्थीचे औचित्य साधून योग्य उपक्रम राबविला.देखावा व आरास स्पर्धेमुळे कित्येकांना श्री मूर्तीसमोर आपली कला दाखविण्याची संधी मिळाली त्याबद्दल अभिनंदन असल्याचे उपसरपंच अमित शेटगावकर यांनी केले तसेच क्लबचे व बक्षीस विजेत्यांचे कौतुक केले. अध्यक्ष विजयेश शेटगावकर यांनी प्रास्ताविक भाषणांत सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.क्लबच्या माध्यमातून उपजत कलाकौशल्य विकसित करण्यास वाव मिळाला व वाडय़ापूरती मर्यदित असल्याने सर्वाचा सहभाग मिळाला.
पुरस्कर्ते शेटगावकर कुटुंबीयांनी आयोजनाची संधी दिल्याने त्याचे विशेष आभार असल्याचे अध्यक्ष विजयेश शेटगावकर यांनी व्यक्त केले.यावेळी सोनू शेटगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रनिवेदन राजन शेटगावकर तर अनिल गाड यांनी आभार मानले.