अर्धा किलो गांजा जप्त : उद्यमबाग पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग परिसरात गांजा विकणाऱया एका त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून 582 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव शहर व उपनगरांत अमलीपदार्थांची विक्री करणाऱया गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मटका, जुगार व गांजा विक्री करणाऱया गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
बुधवारी उत्सव हॉटेल क्रॉसजवळ जाविद ऊर्फ जादू इलियास बेंडीगेरी (रा. बाबले गल्ली, अनगोळ), सुशांत ऊर्फ वाघ्या गोविंद कंग्राळकर (रा. रघुनाथ पेठ, अनगोळ), चेतन मारुती शिंदे (रा. किणये) यांना गांजा विकताना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई करताना अबकारी विभागाचे उपअधीक्षक रवी मुरगोड हेही उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या तिघा जणांवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20 (बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.