डोळ्यांखालची काळी वर्तुळं सौंदर्यात बाधा आणतात. जागरण, ताणतणाव, मोबाईलचा अतिवापर, जीवनसत्त्वांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात. गाजर डोळ्यांसाठी खूपच लाभदायी ठरतं. म्हणूनच गाजराच्या फेस मास्कने ही काळी वर्तुळं घालवता येतील.
हा फेस मास्क तयार करण्यासाठी गाजर, कोरफडीचा गर आणि एक अंडं असं साहित्य घ्या. गाजर धुवून त्याची सालं काढून घ्या. मग हे गाजर मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता हे वाटलेलं गाजर एका वाटीत काढून घ्या. त्यात कोरफडीचा गर आणि अंडय़ाचा पांढरा भाग घाला. सर्व घटक नीट मिसळून घ्या. आता तुम्ही याचा पॅकचा वापर अंडर आय जेल म्हणून करू शकता. या पॅकच्या नियमित वापराने डोळ्यांखालची काळी वर्तुळं दूर व्हायला मदत होईल. काही वर्तुळं दूर करण्यासाठी बरीच कॉस्मेटिक्स वापरली जातात. मात्र काही क्रीम्समुळे ऍलर्जीही होऊ शकते. म्हणूनच झटपट होणारं आणि अगदी सहज वापरता येणारं हे घरगुती अंडर आय क्रीम नक्की वापरून बघा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक जाणवेल.