साहित्य : 1 वाटी मैदा, 2 चमचे तेल, पाव चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा वेलची पावडर, चिमुटभर जायफळपूड, अर्धी वाटी साखर, पाव वाटी दूध, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रक्ट, पाऊण वाटी गाजर किसून, फ्रॉस्टिंगसाठीः अर्धी वाटी चीज क्रिम, 1 चमचा बटर, 4 चमचे साखर मिक्सरला लावून, 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रक्ट, 2 चमचे काजू तुकडे
कृती : ओव्हन 170 डीग्रीवर 15 मिनिटे प्रिहीट करावे. बाऊलमध्ये दूध, व्हिनेगर, साखर, व्हॅनिला एक्स्ट्रक्ट आणि तेल मिक्स करावे. चाळणीत मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि जायफळपूड चाळणीने चाळून दुधाच्या मिश्रणात मिक्स करावे. त्यात गाजर मिक्स करावे. हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या केक पॅनमध्ये ओतून ओव्हनमध्ये अर्धा तास ठेवून बेक करावे. बाऊलमध्ये फ्रॉस्टिंगचे साहित्य मिक्स करावे. केक गार झाला की त्याचे दोन भाग करावेत. एका भागावर फ्रॉस्टिंगचे मिश्रण पसरवावे. त्यावर केकचा दुसरा भाग ठेवून त्यावर फ्रॉस्टिंगचे मिश्रण पसरवून फ्रिजमध्ये ठेवावा. केक सेट झाला की त्याचे स्लाईस करून खाण्यास द्या.