साहित्यः तीन गाजर, दोन संत्री, अर्धे लिंबू, चवीपुरती साखर, चिमुटभर मीठ, आवश्यकतेनुसार बर्फाचे छोटे तुकडे
कृतीः प्रथम गाजर धुवून कोरडी करून घ्यावीत. त्याची दोन्हीकडील टोकं काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. संत्री सोलून त्यातील फोडी काढाव्यात. त्यातील गर काढून घ्यावा. आता ज्यूसर जारमध्ये गाजराचे केलेले तुकडे, संत्र्याचा गर, साखर आणि बर्फाचे छोटे तुकडे घालून मिश्रण बारीक करून घ्यावे. तयार मिश्रण गाळणीत ओतून गाळावे. त्याचा राहिलेला चोथा बाजूला काढावा. आता त्यात लिंबूरसाचे थेंब टाकावेत. तयार ज्यूस थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून अथवा वाटल्यास आणखीन बर्फाचे तुकडे टाकून पिण्यास द्यावे.
टीपः ज्यूसमध्ये साखर वापरणे हे एच्छिक आहे. ज्यूसमध्ये आलं घालायचे असल्यास मिक्सरला लावताना त्यातच आल्याचा छोटा तुकडा घालून मिश्रण बारीक करावे. ज्यूस खूपच दाट वाटत असल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता. ज्यूसमध्ये चाट मसालाही वापरू शकता.