अनिवासी उद्योजकासोबत अडकणार विवाहबंधनात
बॉलिवूडमध्ये ‘बेबी डॉल’ या प्रसिद्ध गाण्याद्वारे धमाल उडवून देणारी गायिका कनिका कपूर लवकरच पुन्हा विवाहबद्ध होणार आहे. कनिका मे महिन्यात अनिवासी उद्योजकासोबत नव्या नात्यात अडकणार आहे. गौतम असे या उद्योजकाचे नाव असल्याचे समजते. कनिकाचा हा दुसरा विवाह ठरणार आहे. कनिकाचा पहिला विवाह देखील अनिवासी उद्योजकासोबतच झाला होता.
कनिकाचा पहिला विवाह राज चंडोकसोबत झाला होता. राज हा लंडनमधील व्यावसायिक असून 2012 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता. तर गौतम आणि कनिका यांच्यात मागील 6 महिन्यांपासून विवाहासंबंधी बोलणी सुरू आहेत. कनिका आणि गौतम हे परस्परांना वर्षभरापासून डेट करत आहेत. दोघांचा विवाह लंडनमध्ये होणार असल्याचे समजते. कनिकाने स्वतःच्या विवाहाबद्दल कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.