गुंजी / वार्ताहर
गुंजी पंचक्रोशीतील आराध्य दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवास रविवार दि. 25 रोजी पालखी सोहळय़ाने प्रारंभ होणार असून दरवषी भाविकांसाठी खुल्या असणाऱया विविध विधी रद्द करण्यात आल्या आहेत. गुंजी श्री माऊली देवी ही भक्तांच्या नवसाला पावणारी व जागृत देवी असा सर्वदूर लौकीक आहे. त्यामुळे दरवषी खानापूर, बेळगावबरोबरच गोवा, महाराष्ट्र अशा अनेक परराज्यातून हजारो भाविक यात्रोत्सवास दर्शनासाठी येत असतात. तसेच नवसाला पावणारी देवी असल्यामुळे तुलाभार, साडीचोळी, सोन्या-चांदीचे अलंकार, खणानारळाची ओटी, अशा अहिसांत्मक पद्धतीने नवस फेडून भाविक आपली मनोकामना पूर्ण करून घेतात. मात्र यावषी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने यात्रोत्सवास निर्बंध घातल्याने यात्रोत्सव साधेपणाबरोबरच भाविकांच्या अनेक धर्मिक विधीना फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे यावषी नवस फेडणे, ओलांडी पडणे, इंगळय़ा नहाणे, ओटी भरणे, तुलाभार करणे अशा पारंपरिक धर्मिक विधिही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वयोवृद्ध व लहान बालकांनाही मंदिर परिसरात प्रवेश निषेध केला आहे.
दुकाने-करमणुकीचे कार्यक्रमही रद्द
या यात्रोत्सवाचे औचित्य साधून यात्राकाळात लाखो भाविक दर्शनासाठी येऊन जात असल्याने दरवषी या यात्रोत्सवात मंदिर परिसरात शेकडो दुकाने थाटली जातात. मात्र यावषी सरकारी आदेशाप्रमाणे गुंजी ग्राम पंचायतीने मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने, चहा हॉटेल्स ,स्टॉल्स, शीत पेये, आईस्क्रीम विक्री, करमणुकीचे साधन यावर संपूर्ण बंदी घातली असून गावात दरवषी यात्रा उत्सवाच्या प्रत्येक रात्री होणारे करमणुकीचे बहारदार कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे समस्त भाविक व व्यवसायिकांनी याची नोंद घेऊन यात्रोत्सवात यात्रोत्सव कमिटीला सहकार्य करावे, असे आवाहन पुजारी व पंच कमिटीने केले आहे.