वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारतामधील दिल्ली या ठिकाणी गुगलचे दुसरे क्लाउड रीजन लवकरच उभारणार असल्याची घोषणा गुगलकडून करण्यात आली आहे. याचे सादरीकरण कंपनीकडून येत्या 2021 रोजी होणार असल्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत. या अगोदर कंपनीने 2017 मध्ये मुंबई येथे गुगल क्लाउडची सुरुवात केली होती. नवीन क्लाउड रीजन गुगलचे सध्याच्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ज्यामध्ये आज आशिया पॅसिफिकचे 8 रीजन आणि ग्लोबली 22 रीजनमधून सेवा देणार आहे.
डाटा ऍक्सेसची सेवा होणार वेगवान
गुगल क्लाउड रीजन, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म (जीसीपी) सेवांच्या माध्यमातून इंडस्ट्रीजच्या ग्लोबल ऑर्गनायझेशन सारख्या मीडिया आणि एटरटेनमेंट, रिटेल इस्टेट आणि उत्पादन सेवा देणार आहे. याचा फायदा भारतामध्ये होणार आहे. गुगलचा ग्राहक डाटा ऍक्सेसची हाय परफॉर्मेस सर्व्हिससाठी सुरक्षा मिळणार आहे. गुगल भारतामधील क्लाउड पायाभूत सुविधांना अत्याधुनिक बनविण्यासाठी जादाची गुंतवणूक करत आहे. यामुळे याचा सर्वाधिक लाभ भारतातील हेल्थकेअर , फायनान्स सर्व्हिसेस क्षेत्रासोबत पब्लिक क्षेत्रातील ऑर्गनायझेशनला फायदा होणार आहे.