ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यावर त्यांची चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर त्यांना अहमदाबाद मधील यू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- अमित शहा यांच्यासोबत कार्यक्रमात हजेरी
नितीन पटेल यांनी मागील दोन दिवस अमित शहा यांच्यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. आज सकाळी देखील एका ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन कार्यक्रमात गृहमंत्र्यांसोबत दिसले होते. त्यानंतर आज संध्याकाळीच त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांना देखील कोरोना संसर्गची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- संसर्ग वाढीत गुजरात 5 व्या स्थानी
दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सद्य स्थितीत देशातील टॉप 10 यादीत गुजरात राज्य पाचव्या स्थानी आहे.