कोटय़वधींची आर्थिक उलाढाल : सोने, नवीन गाडय़ा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह
प्रतिनिधी /बेळगाव
प्रवेशद्वारासमोर रेखाटलेल्या रांगोळय़ा, त्याचबरोबर उभ्या केलेल्या गुढी, शुभेच्छांची देवाण-घेवाण आणि पंचांगांचे वाचन अशा विविध धार्मिक विधीने शहर परिसरात गुढीपाडवा साजरा झाला. यंदाचा पाडवा हा बेळगावकरांसाठी तसेच व्यापारी, विपेते, सराफ यांच्यासाठी विशेष आनंददायी ठरला. दोन वर्षांनंतर खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. शनिवारी दिवसभरात कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याने बाजारात नवचैतन्य पसरले.
हिंदू धर्माप्रमाणे नववर्षाचा प्रारंभ पाडव्याला होतो. गुरुवारपासूनच गुढीपाडव्यांच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण समाज माध्यमावर सुरू झाली होती. शुक्रवारी बाजारपेठेत आंब्याची पाने, कडुनिंब, साखरेच्या माळा, विविध प्रकारचे कलश तसेच फळे, फुले खरेदी करण्यासाठी गर्दी झाली.
शनिवारी सकाळी महिलांनी आकर्षक अशा रांगोळी रेखाटल्या. त्यानंतर साखरेची माळ, खण, फुलांची माळ, आंब्याचे ढाळ, कडुनिंबाची पाने यांच्यासह गुढी सजविण्यात आली. गुढी उभारल्यानंतर काही जणांनी बाजारपेठ गाठली आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, सोने-चांदी यांची खरेदी उरकून घेतली. सायंकाळी सुद्धा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. पाडव्याची सुटी आणि लगेच आलेला रविवार यामुळे बच्चे कंपनी आणि नोकरदारही आनंदित झाले होते. पाडव्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी गृहप्रकल्प तसेच अन्य आस्थापनांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही करण्यात आले. मंदिरांमध्ये पाडव्यानिमित्त पंचांगांचे वाचन करण्यात आले.
सोने खरेदीचा साधला मुहूर्त
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱया गुढीपाडव्याला सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार शनिवारी मोठय़ा प्रमाणात सुवर्णपेढय़ांवर गर्दी दिसून आली. सोन्याच्या दरात काहीशी वाढ असली तरी त्याचा विचार न करता आपल्याला शक्मय तितकी सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली. यामुळे रात्री उशिरापर्यंत बेळगाव व शहापूर येथील सुवर्णपेढय़ा झळाळत होत्या.
वाहन-इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री तेजीत
गुढीपाडव्याला दुचाकी-चारचाकी वाहने मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जातात. काही दिवस पूर्वीच वाहनांचे बुकिंग करण्यात आले होते. डिझेल, पेट्रोलसह आता इलेक्ट्रिक गाडय़ांनाही मागणी असल्याचे दिसून आले. शोरूमसमोर पूजा करून वाहने घरी घेऊन जाण्यात येत होती. हिंडलगा येथील गणपती मंदिर व चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरसमोर पूजा करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांसोबत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी झाली. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉपसह इतर साहित्य खरेदी केले जात होते.
गृहनिर्माणाला पाडव्यामुळे मिळाली उभारी
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे गृहनिर्माण क्षेत्राचे कंबरडे मोडले होते. यामुळे फ्लॅट-प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले होते. परंतु यावषी मात्र गृहनिर्माण क्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅटला सर्वाधिक मागणी होती. नव्या प्रकल्पांमध्ये अनेकांनी बुकिंग केले तर अनेकांनी शनिवारी
फ्लॅटचा ताबा घेतला.