नवे-जुने गुन्हेगार पुन्हा सक्रिय, सुगावा लागू नये म्हणून चोरटय़ांकडून खबरदारी, नागरिकांचे सहकार्य घेण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात चोऱया, घरफोडय़ांच्या मालिका सुरूच आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. सर्वसामान्य बेळगावकरांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घराला कुलूप लावून तासाभरासाठी बाजारात जाऊन येण्याची देखील सोय उरलेली नाही. यावरून बेळगावात पोलीस यंत्रणा सुस्तावली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केवळ पंधरवडय़ातील घटना लक्षात घेता रोज एक तरी चोरीचा प्रकार घडतो आहे. अनेकवेळा तर घरातील मंडळी असतानाच सशस्त्र दरोडय़ाचे प्रकारही घडले आहेत. ‘पुढे खून झाले आहेत, दागिने सांभाळा!’ असा सल्ला देत अनगोळ येथील 70 वषीय वृद्धेच्या अंगावरील दागिने पळविण्यात आले. मुचंडी येथे भरदिवसा साडेचार लाखांची घरफोडी झाली आहे.
हनुमाननगर येथे बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून 13 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. चोरटय़ांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. मात्र, गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे अधिकाऱयांना शक्मय झालेले नाही. मंदिरे, घरे, व्यापारी आस्थापने चोरटय़ांनी लक्ष्य बनविली आहेत. केवळ स्थानिक गुन्हेगारच नव्हे तर आंतरराज्य गुन्हेगारही बेळगावात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.
एखाद्या चोरी, घरफोडी, दरोडय़ाच्या घटनेत गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सुगाव्याच्या शोधात असतात. घटनास्थळावरून मिळणाऱया फिंगरप्रिंट, श्वानपथकाकडून काढला जाणारा गुन्हेगारांचा माग तपासकामात महत्त्वाचा ठरतो. आता हातांचे ठसे मिळू नये म्हणून गुन्हेगार हातात ग्लोव्हज घालून गुन्हे करीत आहेत तर पोलीस श्वानाला चकवा देण्यासाठी वाहनांचा वापर होतो आहे. म्हणून अनेक ठिकाणी ठशांचे नमुने मिळेनासे झाले आहेत.
गुन्हेगारच वरचढ
चोर-पोलीसच्या खेळात खरेतर चोरांवर पोलीस यंत्रणा भारी पडली पाहिजे. सध्या तरी बेळगाव येथील परिस्थिती लक्षात घेता गुन्हेगारच वरचढ ठरू लागले आहेत, असे चित्र पाहायला मिळते आहे. काही ठिकाणी ठशांचे नमुने आढळून आले आहेत. यावरून चोऱया, घरफोडय़ा प्रकरणात सहभागी असलेले गुन्हेगार आंतरराज्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गोवा, महाराष्ट्रातून येऊन गुन्हेगार बेळगाव येथे गुन्हे करू लागले आहेत.
6 डिसेंबर 2020 रोजी झाडशहापूर परिसरात बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील दोन पोलीस व स्थानिक नागरिकांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत प्रकाश विनायक पाटील (वय 30) मूळचा राहणार सरस्वतीनगर, शहापूर, सध्या राहणार झरीवाडा, साखळी-गोवा या अट्टल घरफोडय़ाला पकडले होते. त्याचा साथीदार निथाई खालीपद मंडल (वय 41) रा. पश्चिम बंगाल यालाही अटक झाली होती. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड या दोन पोलिसांनी मोठय़ा धाडसाने झडप घालून प्रकाशला शेतवडीत अटक केली होती.
गुन्हेगार बेळगाव परिसरात पुन्हा सक्रिय
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीकडून 51 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला होता. 848 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक कार जप्त करण्यात आली होती. फुटकळ चोऱया करता करता कोटय़धीश बनलेला प्रकाश पाटील हा युवक अधूनमधून बेळगावात दिसला असून पोलीस अधिकाऱयांना काही ठिकाणी उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहराही दिसला आहे. त्यामुळे जुने-नवे गुन्हेगार बेळगाव परिसरात पुन्हा सक्रिय असल्याचे दिसून येते. खासकरून उपनगरातील व तालुक्मयातील बंद घरे गुन्हेगारांनी आपले लक्ष्य बनविली आहेत. सशस्त्र गुन्हेगारांचा वावर वाढला आहे.
एखाद्या सुगाव्यावरून गुन्हेगारांपर्यंत पोचता आले नाही तर अशा परिस्थितीत चोरी करताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रंगेहाथ पकडण्याचा पर्याय उरतो. या पर्यायासाठी नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरते. त्यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना आता ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.