बेळगाव तालुक्मयातील 516 जणांना लागण
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. जिल्हय़ातील 927 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यापैकी एका बेळगाव तालुक्मयातील 516 जणांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासांत 171 जणांनी कोरोनावर मात केली असून सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे.
बेळगाव शहर व उपनगरांत 440 व ग्रामीण भागात 76 असे एका बेळगाव तालुक्मयात 516 रुग्ण आढळून आले आहेत. एपीएमसी पाठोपाठ माळमारुती पोलीस स्थानकातील सुमारे 8 पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासगी व सरकारी इस्पितळांतील 35 हून अधिक डॉक्टर व कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.
गुरुवारी येथील वाहतूक उत्तर व दक्षिण पोलीस स्थानकातील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस हेडक्वॉर्टर्समधील 4, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील 1, कॅम्प पोलीस स्थानकात 6 व सीएआरच्या 5 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकातील 2, उद्यमबाग पोलीस स्थानकातील 1 पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कित्तूर सैनिक शाळेतील विद्यार्थिनींना लागण सुरूच असून आणखी 12 विद्यार्थिनी कोरोनाग्रस्त झाल्या आहेत.
एका खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालयातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गोकाक येथील परिवहन मंडळाच्या 11 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली असून गुरुवारच्या अहवालात शाळा, कॉलेजच्या मुलांचाही समावेश आहे. सांबरा एटीएसमधील 10 व हालभांवी येथील आयटीबीपी कॅम्पमधील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
होनगा, बस्तवाड, बेकिनकेरे, बोकनूर, गणेशपूर, पिरनवाडी, हिरेबागेवाडी, टिळकवाडी, शहापूर, कंग्राळी खुर्द, बाची, कडोली, काकती, मच्छे, तीर्थकुंडये, संतिबस्तवाड, सांबरा, हिंडलगा, वडगाव, चौगुलेवाडी, भाग्यनगर, हिंदवाडी, आझमनगर, अनगोळ, अंजनेयनगर, अशोकनगर, अयोध्यानगर, कणबर्गी, कॅम्प, बिम्स कॅम्पस, बसवनकुडची, फुलबाग गल्ली-गांधीनगर, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, जाधवनगर, जेएमएफसी कॅम्पस, महांतेशनगर, नेहरुनगर, चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.