जीएसएस कॉलेजमध्ये राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजचे प्रा. उत्तम दळवी यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय लष्करी सेवेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रचंड वाव असून त्यांनी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजसारख्या संस्थेत प्रवेश घेतल्यास एन. डी. ए. मधून सैन्य सेवेत सहज प्रवेश करता येतो, असे मत आरआयएमसी डेहराडूनचे आरआयएमसी डेहराडूनचे प्रा. उत्तम दळवी यांनी व्यक्त केले.
जीएसएस कॉलेजच्या रसायनशास्त्र विभाग व एनसीसी एअर विंग यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती समर्पित भावना, संवाद कौशल्य, एकात्मिक बुद्धीमता इत्यादी गुणांचा सहभाग केल्यास लष्करी सेवेत प्रवेश करणे सोपे जाते. लष्करात विविध प्रकारच्या सेवा अंर्तभूत असून त्यामध्ये तुमच्या कौशल्यांचा पण कस लागतो, असे सांगतानाच लष्करी सेवेची शिस्त व विविध योजना, सवलती इत्यादांची विस्तृत विवेचनात्मक माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बी. एल. मजूकर यांनी लष्करी सेवा ही सर्वश्रे÷ सेवा आहे, असे नमूद केले.
डॉ. संदीप देशपांडे यांनी स्वागत केले. तर प्रा. आर. टी. कटांबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. विनायक बेल्लद यांनी आभार मानले. यावेळी एनसीसी कॅडेटस्, विद्यार्थीवृंद व प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.