जगातील भुताटकीयुक्त बेटाची कहाणी
मेक्सिकोपासून दक्षिणेला जोचिमिको कॅनॉलदरम्यान ‘ला इस्ला डे ला म्यूनेकस’ येथे एक गूढ ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक भीतीदायक बाहुल्या झाडांवर लटकताना दिसून येतील. येथे अनेक रहस्यमय घटना घडत आहेत, ज्यांचा उल्लेघ तेथे राहणारे स्थानिक लोक करतात. परंतु हे बेट आता पर्यटनस्थळ ठरले आहे. या भीतीदायक ठिकाणाला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक दाखल होत आहेत.
या बाहुल्या परस्परांसोबत बोलत असतात. रहस्यमय पद्धतीने स्वतःचे डोळे हलवितात, हा प्रकार पाहून कुठलाही व्यक्ती सहजपणे घाबरू शकतो असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
विशेष बाब म्हणजे हे बेट पूर्वी असे नव्हते. काही वर्षांपूर्वी या बेटाची गणना देखील सर्वसामान्य बेटांमध्येच व्हायची. पण 2001 मध्ये अचानक असे काही घडले की या बेटाला हाँटेड समजले जाऊ लागले. 2001 मध्ये डॉन ज्यूलियन या ठिकाणाचा केअरटेकर होता.
2001 मध्ये अचानक डॉन ज्यूलियनचा मृत्यू झाला, तेव्हापासून या ठिकाणाची गणना आता भयावह ठिकाणांमध्ये केली जाते. स्थानिक लोकांनुसार बेटावर लटकविण्यात आलेल्या या बाहुल्यांमध्ये एका मुलीचा आत्मा आहे. त्यांच्यानुसार काही वर्षांपूर्वी पाण्यात तरंगत वाहून जाणारी एक मुलगी डॉन ज्यूलियनला मिळाला होती. पण तेव्हा तिचा मृत्यू झाला नव्हता.
डॉन ज्यूलियनने तिला वाचविण्याचा अथक प्रयत्न केला, पण तिला वाचविता आले नव्हते. मुलीच्या मृत्यूच्या काही काळानंतर एक बाहुली वाहत आली. डॉन ज्यूलियनने बाहुलीला मुलगी मानून तिला तेथेच झाडावर बांधले. स्थानिक लोकांनुसार त्या घटनेनंतर डॉन ज्यूलियनला अनेक बाहुल्या मिळत राहिल्या.
मुलीच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याने या सर्व बाहुल्यांना झाडांवर लटकविले. या बाहुल्यांमध्ये मुलीचा आत्मा असल्याचे स्थानिक लोकांचे मानणे आहे. या बाहुल्या अनेकदा परस्परांनी बोलतात आणि स्वतःच्या डोळय़ांची हालचाल करतात अशी वदंता आहे. याचमुळे या बेटाचा समावेश जगातील सर्वात भयावह ठिकाणांमध्ये केला जातो. या बेटावर कुणालाच एकटय़ाने फिरण्याची अनुमती नाही. या बेटावर फिरण्यासाठी गाइड सोबत असणे आवश्यक आहे.