प्रतिनिधी/ बेळगाव
गोकाक, अरभांवी मतदार संघामध्ये भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला मेळाव्यामध्ये महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशीकला ज्वोल्ले यांनी सर्व महिलांनी मंगला अंगडी यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत खासदार इराण्णा कडाडी यांच्यासह इतर भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे निधन झाले. ही बाब अत्यंत दुःखद आहे. सर्वांना वेदना देणारी आहे. मात्र भाजपने या पोटनिवडणुकीत मंगला अंगडी यांना तिकीट दिले. याबद्दल सर्वांतून समाधान व्यक्त होत आहे. मलाही व्यक्तीशा आनंद झाला आहे. बेळगावातून एक महिला खासदार म्हणून जाणार असल्यामुळे ही महिलांच्या दृष्टिने आनंददायक बाब असल्याचे शशीकला ज्वोल्ले यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री उमेश कत्ती यांनी विरोधीपक्षनेते सिध्दरामय्या यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांचे आता वय झाले आहे. त्यांनी निवृत्ती घेणे गरजेचे आहे. असे असताना ते प्रचारासाठी येत आहेत. हे खरोखरच खेदाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोकाक, अरभांवी मतदार संघामध्ये घरोघरी जाऊन मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन या सभेनंतर करण्यात आले आहे.
महिलांना घेऊनच ही सभा घेण्यात आली. यावेळी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. त्यानंतर प्रचार फेरीही काढण्यात आले. उत्स्फुर्तपणे मतदारांनी या प्रचार फेरीमध्ये भाग घेतला होता.