प्रतिनिधी / बेळगाव
एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी गोकुळ पाटील याने व्हीटीयूच्या परीक्षेत प्रथम क्रमांकासह 8.61 गुण मिळविले आहेत. एस. जी. बाळेकुंद्रीचे संस्थापक डॉ. शिवबसव स्वामीजी यांच्या 131 व्या जयंती उत्सवात गोकुळ याला सुवर्णपदक व प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. सदर सुवर्णपदक हे नागनूर शिवबसव स्वामी प्रसाद निलयच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एस. व्ही. ईटी यांनी गोकुळचे अभिनंदन केले
आहे.