वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथे एक गाव एक गणपती बसवण्यासाठी सर्व मंडळांनी बैठक घेऊन. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण व सरपंच एम. के. पाटील यांच्या उपस्थितीत एक गाव एक गणपती बसवण्याचे घोषित केले.
गोकुळ शिरगाव गावाशेजारी औद्योगिक वसाहत असल्याकारणाने याठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या गावांमध्ये तरुण मंडळाची संख्याही मोठी आहे .जवळपास 30 ते 40 तरुण मंडळे या गावात आहेत. दर वर्षी गणपती उत्सव गावांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण यावेळी देशावर आलेले कोरणा चे संकट पाहता गावातील सर्व तरुणांनी आज सोमवारी सहा जुलै रोजी संध्याकाळी एकत्र जमून एक गाव एक गणपती बसवण्याचा ठाम निर्णय घेऊन. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत चव्हाण व सरपंच एम के पाटील तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यासमोर समवेत बैठक घेऊन गावातील सर्व तरुण मंडळांनी एकत्र गावामध्ये येऊन या वर्षीचा गणपती उत्सव हा एक गाव एक गणपती या पद्धतीचा होईल असा ठाम निर्णय घेतला.
यावेळी या बैठकीला गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच चंद्रकांत डावरे, सदस्य शामराव पाटील, अनिल पाटील, के पी पाटील .आजय टिपुगडे संतोष कागले, रघुनाथ कांबळे यांच्यासह गावातील सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते.