मुंबई
मुंबई शेअर बाजारात असलेल्या गोपाला पॉलिप्लास्ट लिमिटेडने अल्पावधीतच 70 पट परतावा देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सदरचा परतावा केवळ 8 महिन्यातच मिळाला आहे. 31 मार्च 2021 रोजी कंपनीचा समभागाचा भाव 9.10 रुपये बीएसईवर होता. 1 डिसेंबरला तो 671 रुपयांवर व्यवहार करत होता. म्हणजे गुंतवणूकदारांना कंपनीने 71.50 टक्के इतका दणदणीत परतावा दिल्याचे दिसले. ज्यांनी 1 लाख गुंतवले, त्यांचे 73 लाख रुपये झाले आहेत.