13 जागांसाठी 63 उमेदवार रिंगणात
दापोली / प्रतिनिधी
दापोली नगरपंचायतीला मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचने नुसार दापोली नगरपंचायतीच्या 17 प्रभागांमधील 4 ओबीसी प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यामुळे आता केवळ 13 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. या 13 जागांसाठी 63 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचा 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्दबातल ठरवला. याचा थेट फटका दापोली नगरपंचायत निवडणुकीला बसला. दापोली नगरपंचायत मधील प्रभाग 2 अहमदनगर, प्रभाग 6 पोष्टाचीआळी, प्रभाग 8 फॅमिलीमाळ, व प्रभाग 9 फॅमिलीमाळ या चार प्रभागातील निवडणूक ओबीसी आरक्षण असल्यामुळे स्थगित ठेवण्यात आली आहे. उर्वरित 13 जागांसाठी निवडणूक 21 डिसेंम्बर रोजी पार पडणार आहे. मात्र यामुळे राजकीय बलाबल कमी होऊन निवडणूक अत्यंत संवेदनशील बनली आहे.