प्रतिनिधी/ बेळगाव
जमीन वादातून भरदिवसा भाच्यावर गोळीबार करणाऱया मामाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी आंबेवाडी येथे ही घटना घडली होती.
गोळीबारात अमित बाबुराव पावले (वय 42) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची पत्नी नीता याही जखमी झाल्या आहेत. दहा वर्षांच्या मुलावरही हल्ला करण्यात आला होता. गोळीबार करणाऱया मामाला काकती पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून यासंबंधी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.