प्रतिनिधी /पणजी
गोवा किनारी विभाग व्यवस्थापन आराखडय़ाला अंतिम स्वरुप देण्यासाठी पणजी आणि मडगांव येथे जनसुनावणी आज गुरुवार दि. 8 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होत असून उत्तरेतील सुनावणीचे अध्यक्षस्थान वरिष्ठ अधिकारी श्रीनेत कोठवळे व दशरथ रेडकर तर दक्षिणेत जॉन्सन फर्नांडिस व आग्नेल फर्नांडिस काम पहाणार आहेत.
या जनसुनावणीवेळी खाजन जमिनी, बांध, मानस, भरती रेषा, भरती रेषेपासून आखण्यात आलेल्या 100 मीटर व 200 मीटरची रेषा, मच्छीमारी, क्षेत्र यावर विषय मांडता येतील.
सीआर झेडमध्ये येणारी बंदरे व बंदर हद्दीचा विषय घेतला जाणार नाही तसेच खाजन क्षेत्रामधील खारफुटीचे जंगल झाले असल्यास तेथे बफर झोन रहाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच किनाऱयावरील बांधकामाचा विषय घेतला जाणार नाही. किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी आय.ए.एस अधिकारी कुणाल, संजीव जोगळेकर, दशरथ रेडकर, पराग नगर्सेकर, श्रीनेत कोठावळे, डॉ. जोझेफ डिसौझा, चंद्रकांत वेळीप, नाझारेथ वाझ, शैलेश नाईक, शैलेश फळदेसाई, पेट्रिक गोन्सालवीस, नीतीन मंत्री, सिद्धेश तुयेकर आदी अधिकाऱयांनी योगदान दिले आहे.
सकाळी 10 वाजता सुनावणी
जनसुनावणीवेळी बाजू मांडण्यासाठी उत्तर गोव्यात आतापर्यंत फक्त 120 जणांनी आपल्या नावांची नेंद केली आहे. गुरुवारी आयत्यावेळी नावे स्वीकारली जातील, मात्र त्यांना नंतर संधी दिली जाणार आहे. हरकती मांडणाऱयामध्ये प्रथम क्रमांक काशिनाथ शेटये यांचा असून आंतोनियो मिनेझिस सावियो ब्रिटो, मोनिका कार्दोज, दिवाडीचे सरपंच मारियो पिन्टो, प्रसाद पेडणेकर, स्नेहल हरमलकर, एल्वीस आगियार, अमृत आगरवाडेकर, अमित मोरजकर, भूषण राऊत, सुनिता घाडी, अरविंद परब, नाझारेथे फर्नांडिसा, सुनील सिरसाट अशी काही नावे प्रामुख्याने पुढे आली आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, त्यापूर्वी आराखडय़ाचे प्रदर्शन केले जाईल.
कांपाल परेड मैदानावर अधिकारी पार्किंग
सुनावणीसाठी येणाऱयांना कांपाल परेड मैदानावर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कला अकादमी वरुन येणारी वाहने बांदोडकर फुटबॉल मैदान व पणजी जिमखाना येथे मिरामारहून येणारी वाहने कांपाल इंडोर मैदानाकडे व सांतईनेजकडून येणाऱया वाहनांना अग्निशामक दलाच्या मैदानावर पार्किंग व्यवस्था केली गेली आहे. बालगणेश मंदिर ते अग्निशामक दल पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद रहाणार आहे.