आगोंद पंचायत क्षेत्रातील 800 घरांना भेटी
प्रतिनिधी /काणकोण
गांधी जयंतीदिनी आगोंद पंचायत क्षेत्रात सुरू केलेली गोवा फॉरवर्डची परिवर्तन यात्रा आज 11 पासून श्रीस्थळ पंचायतीमध्ये फिरणार आहे. आगोंद पंचायतीमध्ये एकूण 3300 मतदार असून 2 ते 9 या कालावधीत प्रशांत नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी या पंचायतीमधील एकूण 800 घरांना भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत गुरू बांदेकर, तेजन मुडकूडकर, रॅमी बोर्जिस, कोस्तांसियो फर्नांडिस यासह दररोज 15 कार्यकर्त्यांनी या संपर्क भेटीत भाग घेतला. हे सर्व कार्यकर्ते स्थानिकच आहेत. मुडकूडपासून सुरू केलेल्या या यात्रेचा बेतूल भागात समारोप करण्यात आला, अशी माहिती नाईक यांनी दिली.
आगोंदच्या मतदारांना आता बदल हवा आहे. यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले विजय पै खोत, रमेश तवडकर आणि इजिदोर फर्नांडिस यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या मतदारांनी गोमंतकीयांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढे आलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाला हिरवा कंदील दिलेला आहे, असा दावा नाईक यांनी केला. काणकोणचे मतदार सुजाण त्याचबरोबर खऱया-खोटय़ाची पारख करणारे आहेत. या मतदारसंघातील आतापर्यंतचे राजकारण जाताöधर्मापुरते सीमित कधीच राहिलेले नाही. म्हणूनच त्या काळात राजकारणात नवखी आणि विशेष अनुभव नसलेली संजय बांदेकरसारखी व्यक्ती काणकोणचे नेतृत्व करू शकली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्व. बांदेकर यांच्या कारकिर्दीत काणकोण मतदारसंघात उभ्या राहिलेल्या अनेक प्रकल्पांपैकी आगोंद, देवाबाग येथील क्रीडा प्रकल्प, गायतोंडे मैदान, मत्स्योद्योग खात्याची जबाबदारी सांभाळताना त्यांनी मच्छीमार बांधवांसाठी विविध ठिकाणी उभारलेली सभागृहे, विविध भागांतील रस्ते आणि अन्य प्रकल्प आपल्या परिवर्तन यात्रेच्या दरम्यान आपल्याला अनुभवायला मिळाले. त्यांचीच पुण्याई आपल्या पाठिशी आहे. आगोंदचे मतदार अजूनही संजय बांदेकर यांच्या कार्याची स्तुती करतात. या पंचायतीमधील परिवर्तन यात्रा खूपच फलदायी झाली, असे सांगून नाईक यांनी आगोंदवासियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. येणाऱया काळात श्रीस्थळ, गावडोंगरी, खोतीगाव, पैंगीण, लोलये पंचायती आणि शेवटी नगरपालिका क्षेत्रातील मतदारांच्या भेटी आपल्याला घ्यायच्या आहेत. परिवर्तन यात्रेचा उद्देशच मुळी काणकोणात परिवर्तन करण्याचा असून त्यात निश्चितच आपल्याला यश मिळेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आहे.